कोल्हापूरात एसटी झाडावर आदळून 77 प्रवाशी जखमी

कोल्हापूर – चंदगड-हेरे मार्गावर सुळये येथे एसटी झाडावर आदळून 77 प्रवासी जखमी झाले आहेत. चालक व वाहकासह 31 प्रवासी गंभीर आहेत. जखमींना गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भरधाव टेम्पोला चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. याची नोंद चंदगड पोलिसांत करण्यात आली आहे. चंदगड आगाराची कोदाळी मुक्‍कामी गेलेली बस सकाळी चंदगडला येत होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बसमध्ये प्रवासीही खचाखच भरले होते. बस सुळये येथील वळणावर आली असताना समोरुन आलेल्या डंपरला चुकविताना चालकाने बस बाजूला घेतली असताना चिखलातून घसरून बस झाडावर आदळली. यावेळी जोराचा धक्‍का लागल्याने सर्व प्रवासी समोरच्या सीटवर जावून आदळले. यात अनेक प्रवाशांच्या नाकाला, तोंडाला गंभीर दुखापत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)