कोल्हापूर – धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व धर्मिय, सर्व जातीय तसेच आंतरजातीय अशा सुमारे 50 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 11.54 या शुभ मुहर्तावर पेटाळा मैदान येथे करण्याचे निश्चित केले असल्याची माहिती सहायक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण आणि विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे यांनी दिली.
शासनाच्या आदेशानुसार धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील विविध धर्मातील गरीब कुटुंबातील मुलींच्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. या सोहळ्याच्या नियोजनासाठी जिल्हास्तरीय विवाह सोहळा समितीची बैठक आज पेटाळा येथे सहायक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे, नंदकुमार मराठे, विजयसिंह डोंगळे, समृध्दी माने, सुप्रिया ताडे, निर्मितीचे आनंद खासबागदार, बी न्युजचे संपादक चारुदत्त जोशी, प्रभाकर हेरवाडे, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, प्रमोद पाटील, विनोद पाटील, सुजय पित्रे, राजू मेवेकरी, राहूल कुलकर्णी, सुरज ढोली (गुरव) यांच्यासह समितीचे सदस्य आणि विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा