कोलमडलेली पीएमपी डिझेल दरवाढीने आणखी गाळात

दररोजचे आर्थिक गणित ढासळले


मिडी बसचा सांभाळ म्हणजे ‘पांढरा हत्ती’

पुणे- सातत्याने वाढणाऱ्या डिझेल दरवाढीने अधीच कोलमडलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमला) अर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पीएमपीच्या 571 बसेस सीएनजीच्या, तर 900 बसेस डिझेलवर धावणाऱ्या आहेत. जानेवारीपासून डिझेलच्या दरात जवळपास 4 रुपयांची वाढ झाल्याने पीएमपीला दररोज सुमारे अडीच लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

दि. 16 मार्च ते 16 एप्रिल या महिनाभरातच डिझेलच्या दरात पावणेतीन रुपयांची वाढ झाली. त्यामुळे महिनाभरातच सुमारे सव्वालाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. पीएमपीकडे सुमारे 900 हून अधिक बस डिझेलवर धावणाऱ्या आहेत. यासाठी दररोज सुमारे 37 हजार 500 लिटर इंधन लागते. यातच गेल्या एक महिन्यात शहरात 130 मिडी बस दाखल झाल्या. यामुळे जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पीएमपीएमएलच्या ताफ्यात 571 बस सीएनजीवरील आहेत. भाडेतत्वावरील सर्व 653 बस सीएनजीवर धावतात. तर 900 बस डिझेलवर धावणाऱ्या आहेत. पीएमपीएमएलच्या बससाठी हिंदूस्तान पेट्रोलियम कंपनीकडून डिझेल खरेदी केले जाते. सध्या पीएमपीएमला दररोज सुमारे 24 लाख रुपये डिझेलसाठी मोजावे लागतात.

जानेवारीच्या सुरूवातीला डिझेलचा दर 60.07 रुपये होता. त्यावेळी दररोज 36 हजार लिटरसाठी सुमारे 21 लाख 62 हजार रुपये पीएमपीएमला मोजावे लागत होते. सध्या डिझेलचा हा दर 64.16 रुपये एवढा आहे. त्यामुळे मागील साडेतीन महिन्यांत पीएमपीला मिळणाऱ्या डिझेलच्या दरात 4.09 रुपयांचा फरक पडला आहे. यामुळे पीएमपी अर्थिक अडचणीत आली आहे. अशातच येत्या काळात आणखी काही मिडीबस शहरात दाखल होणार आहेत. यामुळे हा भार आणखी वाढणार असल्याचे पीएमपीएमएल अधिकाऱ्यांनी सांगितले.

..तर वाढू शकतात तिकीट दर
दिवसेंदिवस वाढणाऱ्या डिझेलच्या दरामुळे पीएमपीएमएलवर दररोज लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड पडत आहे. यामुळे डिझेलचे वाढणारे दर पाहता भविष्यात तिकीट दरांमध्ये पीएमपीने वाढ केली, तर नवल वाटू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

900 हून अधिक
बस डिझेलवर धावणाऱ्या


37 हजार 500 लिटर
दररोज लागणारे इंधन


24 लाख रुपये
रोजचा डिझेल खर्च


4.09 रुपयांनी
महागले डिझेल

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)