कोर्टीतील पाणीप्रश्‍नी भिगवणच्या विद्यार्थ्यांचे सामाजिक भान

भिगवण- कोर्टी (ता. करमाळा) येथील ज्ञानप्रबोधिनी मतीमंद निवासी विद्यालयाला पाण्याची कायमची व्यवस्था करण्यासाठी पाण्याचा टॅंकर खरेदी करण्यात आला. यासाठी भिगवण येथील भैरवनाथ विद्यालयातील 1996-97 च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील पाणी प्रश्‍न कायमचा सोडवण्यासाठी 51 हजार रुपयांची भरीव देणगी दिली. विद्यालयात अनेक झाडे लावली आहेत त्यांना पाण्याविना जगविणे कठीण होते. त्यासाठी खासगी टॅंकरद्वारे पाणी पंधराशे ते दोन हजार रुपयांना आणावे लागत होते. त्यामुळे हा खर्च पेलणे विद्यालयाला जिकीरीचे झाले होते.

माजी विद्यार्थी संघटनेच्या सर्वेक्षणात ही बाब लक्षात आली. त्यामुळे कोर्टी येथील विद्यालयाचे शिक्षक रोहित बागडे यांच्याशी भैरवनाथ विद्यालयातील 1996-97 चे विद्यार्थी राहुल झाडे, जालिंदर बंडगर यांनी चर्चा केली. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामाजिक दायित्व जपत या पाण्याचा टॅंकर देण्याचा संकल्प केला. माजी विद्यार्थ्यांनी 51 हजार रुपये रक्‍कम जमा केली. 9 हजार लिटर क्षमतेचा 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा आणि सर्वांनी मिळून कार्य पूर्णत्वास नेले. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने राहुल झाडे यांनी मनोगत व्यक्‍त केले. सर्व माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी नितीन चितळकर, प्रदीप ताटे, दादासाहेब थोरात, विजय थोरात, सचिन शेवते आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.