पिंपरी – कोयता बाळगला; तरुणाला अटक

पिंपरी – बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली. आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी थेरगाव येथे मंगळवारी (दि. 19) रात्री साडेअकराच्या सुमारास केली. अजय विजय सूर्यवंशी (वय 20, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगावमधील तापकीर चौकातील हॉटेल मिटिंग पॉईंट शेजारी जय मल्हार पान शॉप आहे. त्या शॉपवर अजय लोखंडी कोयता घेऊन थांबला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अजय याला अटक करून त्याच्याकडून एक लोखंडी कोयता जप्त केला आहे. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. वाकड पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.