कोपरगाव रेल्वेस्थानकात पुणे-हटिया एक्‍सप्रेसची पोलिसांकडून कसून तपासणी

अखेर “बॉम्ब’ची अफवाच

कोपरगाव  – पुणे-हटिया सुपरफास्ट एक्‍सप्रेस पुण्याहून हटियाकडे जाणारी रेल्वे सकाळी 11 वाजता निघाली होती. 20 बोगीच्या या रेल्वेत 1000 च्या वर प्रवासी होते. दरम्यान एका अज्ञात इसमाने पुणे रेल्वे प्रशासनास गाडीत बॉंब असल्याचे सागितले. त्यामुळे कोपरगाव रेल्वे स्थानकावर 4.12 वाजता थांबवण्यात आली. तसेच तपासणी केली. मात्र बॉंब असल्याची केवळ अफवा असल्याचे समोर आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्‍वास टाकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत माहिती अशी की, पुणे रेल्वेला कार्यालयास पुणे-हटिया गाडीत बॉंब असल्याचे एका व्यक्तीने कळविले. त्यावर त्यांनी कोपरगाव व मनमाड पोलिसांना कळविले. पुणे-हटिया सुपरफास्ट एक्‍सप्रेस कोपरगाव रेल्वे स्थानकात आल्यावर तिला थांबविण्यात आले. यावेळी शिर्डी व कोपरगाव पोलिसांना तातडीने पाचारण करुन प्रवाशांसह सामानाची रेल्वे डब्यांची झडती घेण्यात आली. स्थानिक रिक्षावाल्यांनी तसेच शिंगणापूर व रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांनीही पोलिसांना बॉंबसदृश वस्तू शोधण्यासाठी मदत केली.

शिर्डीच्या बॉंब शोधक व नाशिक पथकाने शिर्डी (बीडीबीएस) या पथकाला पाचारण केले. त्यांच्या सोबत बॉंब शोधक श्‍वान वर्धक याच्या मदतीने संपूर्ण रेल्वेची तपासणी करण्यात आली. बॉंब शोधक पथकाने अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या साह्याने संपूर्ण रेल्वेची कसून तपासणी करण्यात आली. अखेर बॉंब नसलेल्याची खात्री पटल्यानंतर सायंकाळी 6.50 मिनिटांनी ही रेल्वे मनमाडकडे रवाना करण्यात आली.

रेल्वे पोलिसांनी ज्या क्रमांकावरून दूरध्वनी आला होता, त्या क्रमांकावर कॉल केला असता, तो बंद असल्याचे निदर्शनास आहे. बॉंब असल्याची ही अफवाच ठरल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मनमाड रेल्वे पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार एस. पी. कोष्टी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, कोपरगाव रेल्वेचे आर. एन. मीना, संतोष पवार, एम. के. दहे व नवनाथ मदने यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)