कोथिंबिर गड्डी वीस रुपयांवर

पिंपरी – वैशाख वणवा पेटल्याने पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. दैनंदिन आहारात आवश्‍यक असलेली कोथिंबीरीची आवक देखील घटली आहे. एका गड्डीचा भाव वीस रुपयांवर पोचला आहे. मात्र, अजुनही ग्राहकांकडून कोथिंबीरीला मागणी असल्याचे बाजारात चित्र आहे.

वाढत्या उन्हाचा पालेभाज्यांच्या आवकेवर दरवर्षी परिणाम होत असतो. त्यामुळे आवक घटून, बाजारभाव जवळपास दुपटी-तिपटीने वाढतात. यंदा देखील बाजारात पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. मेथीची दहा रुपयांना मिळणारी गड्डी आता पंधरा ते वीस रुपयांना विक्री होत आहे. याशिवाय पालकची आवक घटले असून भावही घटले आहेत. दहा रुपयांना दोन गड्ड्या अशी पालकची बाजारात विक्री होत आहे. शेपू व कांदापातची दहा रुपये प्रति गड्डी विक्री होत आहे.

मावळ तालुक्‍याबरोबरच पुणे मार्केटयार्डमधून कोथिंबीरीची आवक होत असते. उन्हाळ्याशिवाय अन्य ऋतुंमध्ये दर दिवशी दोन ते अडीच हजार कोथिंबिरीच्या गडड्या आवक होत असते. मात्र, उन्हाळ्याला सुरुवात झाल्यानंतर ही आवक एक हजारांवर पोचते. सध्या कोथिंबिरीची आवक 750 गड्ड्या झाली आहे. या आवकेत आणखी घट होण्याची शक्‍यती व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)