कोणी काहीही केले तरी मताधिक्‍याने निवडून येऊ- बाळासाहेब थोरात

माजी मंत्री बाळासाहेब थोरात हंगेवाडी येथे ऊसउत्पादकांचा मेळावा उत्साहात

संगमनेर: कोणी काहीही केले, तरी आगामी 2019 ची निवडणूक आपण मोठ्या मताधिक्‍याने जिंकणार आहोत. मात्र काही लोक तालुक्‍यात खुटखुट करत आहेत. आपलेच दात आणि आपलेच ओठ, अशी स्थिती असली, तरी तालुक्‍याच्या राजकारणावर कोठूनही आघात होणार असेल, तर आपण सतर्क राहून तिथल्या तिथे उत्तर देऊ, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील हंगेवाडी आज आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत ऊस उत्पादकांचा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. यावेळी थोरात यांनी पूर्व भागात सुरू असलेल्या राजकारणावर चांगलाच आघात केला.

थोरात म्हणाले, डिग्रस, आंभोरे, मालुंजे, निमोणमध्ये काही लोक खुटखुट करत आहेत. हे लोक कशासाठी उद्योग करतात समजत नाही. आमचे मन मोठे आहे. अंकुश कांगणे यांनासुध्दा आपणच सभापती केले होते. आपल्याविरोधात सुरू असलेल्या राजकारणाला तोंड देण्यासाठी केवळ मीच नाही, तर आपण सर्वजण समर्थ आहोत.

सभागृह बांधण्यासाठी निधी दिला. मात्र सभागृह होताच रात्रीतून तेथे वेगळीच पाटी लावण्याचे प्रकार कशासाठी, असा सवाल करत प्रवरेच्या कार्यक्षेत्रातील चौदा गावे संगमनेरमध्ये असताना देखील तेथे येण्यापासून कधी आमदार, खासदारांना रोखले नाही. त्यांच्याबद्दल कधी मनात राग धरला नाही. त्यांच्या कार्यक्षेत्रात ते कार्यक्रम करतात. मात्र कामे मी करत असताना ते फीत कापत फिरतात. इतके कोते मन मोठे राजकारण ठेवतात. त्यांना राज्य सांभाळायला दिले आणि ते येथे अडकून पडतात, हे चित्र अतिशय वाईट आहे.

सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी येथील सर्वच संस्था चांगल्या पध्दतीने चालविल्या जातात. कोणतेही मापदंड येथील विकासाला लावावेत आपण कोठेच कमी नाही. राज्यातील 191 पैकी केवळ दहाच कारखाने एफआरपीप्रमाणे भाव देतात, त्यात आपला समावेश आहे. परिणामाची तमा न बाळगता खरे बोलण्याची आपली तयारी आहे. मंत्री पंकजा मुंडे सेल्फी प्रकरणात आपण त्यांची पाठराखण केली. निळवंडे धरणाच्या कामात मधुकर पिचडांची मदत झाली. चार वर्षांनंतर आता धरणासाठी पैसे आले. आता धरणाच्या कामावरुन श्रेयवाद सुरु आहे. आपण कामाला महत्व दिले. 133 कोटींतून अन्य कामे करायला हवी. मात्र वर करु देत नसाल, तर खालीदेखील काम करु दिले जाणार

नसल्याचे काही लोक सांगत असल्याचे ते म्हणाले. डॉ. तांबे, माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, बाजीराव खेमनरे आदींची भाषणे झाली.

दहाव्यातही ते राजकारणावरच बोलतात

संगमनेरच्या राजकारणाचा राज्यात चांगला लौकीक आहे. मात्र याला नख लावण्याचे प्रयत्न होत आहे. काही लोकांवर तोंड वाजवत फिरण्याची जबाबदारी दिल्याने ते दहाव्यात देखील श्रद्धांजलीऐवजी राजकारणावर बोलतात, अशी टिप्पणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)