कोणीही या कागदपत्रे मिळवा!

  • बांगलादेशीयांकडे आढळले पॅन, आधार, जन्मदाखला, तर ग्रामपंचायतीने दिले रहिवासी दाखले
    बारामती तालुक्‍यात 19 बांगलदेशी वास्तव्य प्रकरण

बारामती – बनावट कागदपत्रांच्या आधारे बारामती तालुक्‍यातील विविध ठिकाणी वास्तव्याला असणाऱ्या 19 बांगालादेशीयांना शनिवारी (दि. 26) बेड्या ठोकल्य होत्या. दरम्यान, बारामती न्यायालयाने या 19 बांगलादेशीयांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली असली, तरी पोलिसांच्या तपासा या बांगलादेशीयांना ग्रामपंचायतींनी रहिवासी दाखले दिले असून त्यांच्याकडे पॅन, आधार कार्ड, रहिवासी तसेच शाळांमधून जन्मदाखलाही मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असल्याने सुरक्षायंत्रणचे धिंडवडे निघाले असून भारतात कोणत्याही प्रकारचे बनावट कागदपत्रे तयार करून मिळतात हे या घटनेमुळे पुढे आले आहे.
पुणे जिल्ह्यातील अनेक भागात दहशतवादी पथकाने छापे टाकून पोलिसांच्या मदतीने बांगलादेशीयांना अटक अटक केली आहे. हे बांगलादेशी नागरिक वेगवेगळ्या भागात भंती तसेच भिखू म्हणून वास्तव्यास होते. तर या बांगलादेशीयांना ग्रामपंचायतींचा आधार घेतल्याचे निष्पन्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने आपली सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे, हे या घटनेवरून समोर आले आहे त्यामुळे वेळीचजर योग पाऊल नाही उचलले तर गंभीर घटनांना सामोरे जावे लागेल यात शंकाच नाही.
बारामती शहर तसेच तालुक्‍यातील काही गावांत हे बांगलादेशी वास्तव्यास होते. माळेगाव येथे मोठ्याप्रमाणात कारवाई करीत बांगलादेशीयांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर मोरगाव पररिसरात देखील करवाई करण्यात आली. दरम्यान, तालुक्‍यातून अटक करण्यात आलेल्या 19 बांगलादेशीयांना सुरुवातीला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर पोलीस कोठडीत त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आल्याने पुढील तपासासाठी पोलिसांनीत या 19 बांगलादेशीयांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे मंगळवारी (दि. 29) केली ती न्यायालयाने मान्य करीत आणखी तीन दिवसांची कोठडी त्यांना सुनावण्यात आल्याने आता या तीन दिवसांत आणखी किती धक्कादायक बाबी समोर येणार हे पाहवे लागेल.

  • बारामती शहाराचे नागरकिरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. औद्योगीक, शैक्षणीक क्षेत्रातील प्रगतीमुळे परराज्यातील लोंढे बारामतीचे दिशेने येत आहेत. शहारातील आनेक ठिकाणी या परप्रांतीयांचे वास्तव्य आहे. मात्र याबाबतची नोंद पोलिस ठाण्यात आसेलच नाही. त्यामुळे बारामतीकरांसाठी देखील ही धोकयाची घंटा मानली जात आहे. याबाबत सतर्क राहाण्याची गरज आहे. घरमालाकांनी पोलिस ठाण्यात भाडेकरुंची नोंद ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठीची आवश्‍यक कागदपत्रे तपासणे देखील महत्वाचे आहे. याबाबत गांभिर्याने पहाने गरजेचे आहे.

बारामती शहरातील नागरिकांना याबाबत वेळोवेळी सावध केले आहे. भाडेकरुंच्या नोंदी पोलीस ठाण्यात देणे कायद्याने बंधनकारक असून कोणत्याही प्रकारे बेकायदेशीरपणे भाडेकरु ठेवणे गुन्हा आहे, असे असले तरी नागरिक पैशांसाठी सुरक्षायंत्रणा धोक्‍यात आणत असल्याचे वास्तव आहे. काही जण नोंदणी करीत आहेत मात्र, त्याचे प्रमाण नगण्य आहे त्यामुळे शहारात व्यापक स्वरुपात मोहीम हाती घेण्यात येणार आहे. नागरीकांनी देखील चौकसपणे राहाण्याची गरज आहे.
– मानसिंह खोचे, पोलीस निरीक्षक, बारामती शहर

  • अन्य देशात जाणार होती…
    फाळणीनंतर काही कुटुंबे बांगलादेशात तर काही पश्‍चिम बंगालमध्ये स्थायिक झाले. आत्ता पकडण्यात आलेल्या 19 जणांचे नातेवाईक भारतातील पश्‍चिम बंगालमध्ये वास्तव्याला आहेत. तर या बंगालादेशीयांना इतर धर्मियांकडून होणाऱ्या त्रासामुळे ते अन्यत्र पसार होण्यासाठी भारतात दाखल झाले होते. येथून भारतीय पासपोर्ट काढत ते अन्य देशात निघून जाणार होते, अशी माहितीही पोलीस तपासातून पुढे आली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)