कोणाही भारतीय नागरीकावर अन्याय होणार नाही – राजनाथसिंह

आसामातील चाळीस लाख लोक नागरीकत्वाबाहेर


भवितव्याविषयी चिंता; देश सोडावा लागण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – आसामातील नागरीकांचा अभ्यास करून नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स फॉर आसामने त्या राज्यातील अधिकृत नागरीकांची एक यादी प्रकाशित केली आहे. त्या यादीतून राज्यात सध्या राहणाऱ्या तब्बल चाळीस लाख लोकांनी नावे वगळण्यात आली आहेत. त्यावरून एकच खळबळ माजली आहे.

या लोकांचे भवितव्य आता अधांतरी बनले असून त्यांना देशही सोडण्याची वेळ येऊ शकते. तथापी या विषयी खुलासा करताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे की वगळण्यात आलेल्या प्रत्येक नागरीकाला आपले नागरीकत्व सिद्ध करण्याची संधी जाईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आसामातील अधिकृत नागरीकांची यादी आज जाहीर झाल्यानंतर त्यावर उलट सुलट प्रतिक्रीयां वेगाने येऊ लागल्या आहेत. चाळीस लाख लोक या यादीत नसल्याने ते बेकायदेशीर नागरीक ठरत आहेत किंवा त्यांच्यावर बांगला घुसखोरांचा ठपका आला आहे. तथापी ही यादी निष्पक्षपणे तयार करण्यात आली आहे असा दावा राजनाथसिंह यांनी केला आहे. यात नाव नसलेल्यांना नागरीकत्वाचा पुरावा देण्याची संधी दिली जाणार आहे. कोणाहीं विरोधात आकसाने किंवा बेदरकारपणे कारवाई केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. अधिकृत रजिस्टर मध्ये ज्या नागरीकाचे नाव नाही त्यांना लवादाकडे जाता येईल. त्यांना तेथे आपले नागरीकत्व सिद्ध करण्याची रितसर संधी तेथे दिली जाईल असे ते म्हणाले.

नागरीकत्वाच्या या यादीविषयी कोणताही गैरसमज पसरणार नाही किंवा विनाकारण वाद निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी अशी सुचनाहीं राजनाथसिंह यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच राज्यातील अधिकृत नागरीकांची ही यादी तयार करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)