कोटेवाडीत 44 लाखांची करवसुली बाकी

भवानीनगर- गावातील नागरिकांकडे घरपट्टी 26 लाख तर पाणीपट्टी 18 लाख, अशी एकूण 44 लाखांची करवसुली बाकी आहे. सप्टेंबरपर्यंत भरणा केल्यास 5 टक्के सूट मिळणार आहे. गावातील कर वसूल झाला तर गावात आणखी काही सुधारणा करता येतील, यासाठी ग्रामस्थांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरावी, असे आवाहन कोटेवाडीचे सरपंच विद्याधर काटे यांनी केले.
काटेवाडी (ता. बारामती) ग्रामसचिवालयात आज सकाळी 11:00 वाजता ही ग्रामसभा सुरु झाली. यावेळी सरपंच काटे बोलत होते. येथील ग्रामसभा विविध विषयांवर दोन तास चालली यात गावातील अनेक नागरिकांनी आपापले प्रश्‍न मांडून सर्व विषयांवर चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच काटे होते. ते म्हणाले की, गावाचा विकास करायचा असेल तर ग्रामस्थांनी घरपट्टी व पाणीपट्टी त्वरित भरावी. ग्रामसभेस उपसरपंच संजीवनी गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ काटे, के.टी.जाधव, संजय काटे, बाळासाहेब शिंदे, मिलिंद काटे, जितेंद्र काटे, वैद्यकीय अधिकारी मार्तंड जोरी, शितल काटे, पशुवैद्यकीय अधिकारी माने, प्रकाश काटे, पोलीस पाटील सचिन मोरे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसभेपुढे एकून 10 विषय घेण्यात आले, याचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी केले.
ग्रामसुरक्षा दल गावात स्थापन करणे, गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी संमतीने ठराव करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयातून साधारण 17 दाखले नागरिकांना देता येतात ते दाखले पेपरलेस पद्धतीने देण्याचे निर्णय लवकरात अमलात येणार आहे. याबाबत माहिती देण्यात आली. शौचालयाचा वापर न करणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबाना स्वस्तधान्य दुकानातून धान्य न देण्याचा प्रस्ताव बाळासाहेब शिंदे यांनी मांडला, ग्रामस्थांनी एकमताने या ठरावास मान्यता दिली.
गावातील रस्त्याकडेला काही नागरिकांनी दगड लाऊन अतिक्रमण केले आहे. तसेच जागा न सोडता घरे बांधून बांधली आहेत. रस्त्याकडेने दगडांची वरळ घातल्याने रस्ता अरुंद झाला असून वाहने चालविताना अडचण येत आहे. यावर कारवाई व्हावी. गावातील स्वच्छता तसेच पाणी पुरवठा अंदाजे 600 नागरिकांनी घेतली आहे, त्यांची पाणीपट्टी एक महिन्याची घ्यावी त्यांनी ती न दिल्यास त्यांना तशी नोटीस द्यावी. मात्र, पुन्हा त्यांनी पाणीपट्टी न दिल्यास ते कनेक्‍शन तोडून टाकावे. सर्वांचे पाणी कनेक्‍शन घेताना डिपॉझीट घेतले आहे का, ते पाहून घ्यावे, आशा विविध विषयांवर ग्रामसभेत चर्चा होऊन राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)