कोटा प्रकारणामुळे अकरावीचे वेळापत्रक पुन्हा बदलले

तिसरी यादी 31 जुलै; तर पसंतीक्रम बदल 27 व 28 जुलैला
पुणे- अकरावी प्रवेशातील कोटा प्रवेशाबाबत न्यायालयाने 26 जुलै रोजी केलेल्या सूचनांनंतर आता अकरावीचे वेळापत्रक पुन्हा बदलले आहे. अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी 31 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे; तर यासाठी पसंतीक्रम बदल 27 व 28 जुलै रोजी करता येणार आहे.
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आतापर्यंत तिसऱ्यांदा बदलण्यात आले आहे. सर्वप्रथम जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानंतर हे वेळापत्रक तिसऱ्या फेरीपर्यंत तिसऱ्यांदा बदलण्यात आले आहे. सुरुवातीला पावसाचे कारण सांगण्यात आले होते, त्यानंतर अल्पसंख्यांक महाविद्यायलयातील प्रवेशाच्या जागा व आता पुन्हा एकदा अल्पसंख्यांकांबाबत दिलेल्या कोट्यातील प्रवेशामुळे हे बदलण्यात आले आहे.
या आधी जाहीर केल्याप्रमाणे अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी ही 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार होती. त्यासाठी 23 व 24 जुलै रोजी पसंतीक्रमात बदल करता येणार होता. मात्र 26 जुलै रोजी अल्पसंख्यांक महाविद्यालयांना केवळ त्यांचे इन हाऊस कोट्यातील प्रवेश नियमित प्रवेशात समर्पित करण्यात येणार आहेत, असे आदेश दिले. त्यानुसार आता पुन्हा अल्पसंख्यांक महाविद्यालयातील जागांमध्ये बदल होणार असल्याने एकूणच प्रवेश प्रक्रिया पुढे ढकल्यात आली आहे. त्यानुसार आता 31 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता तिसरी यादी जाहीर केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)