कोकण रेल्वे सुरू करण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस यांचे योगदान

संग्रहित छायाचित्र.....

पुणे – मुंबई ते मंगलोर, कोकण, गोवा आणि कर्नाटकसह दक्षिण भारतातील किनाऱ्यांवरच्या गावांसाठी 1993 पर्यंत थेट रेल्वेची सोय नव्हती. या भागात जाण्यासाठी पर्यायी आणि लांबच्या मार्गांचा वापर करावा लागत असे. यावर माजी मंत्री मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडीस यांनी कोकण रेल्वेची संकल्पना मांडली. फर्नांडिस हे 1989 ते 1990 दरम्यान रेल्वे मंत्री होते. त्यावेळी खंबीरपणे कोकण रेल्वे झालीच पाहिजे या मताशी ठाम राहून काम केल्याने कोकण रेल्वे प्रत्यक्षात आली.

देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण करताना “कोकण रेल्वेचा निर्माता’ असे म्हटले आहे. फर्नांडीस यांना खऱ्या अर्थाने कोकण रेल्वेचे निर्माते म्हटले जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोकण रेल्वे हा प्रोजेक्‍ट भारतासाठी एक मोठा आणि सर्वांत अवघड असा इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रोजेक्‍ट होता. अनेक खडतर प्रयत्नानंतर तो प्रत्यक्षात आला. सद्यस्थितीत कोकण रेल्वे तीन राज्यांतून एकूण 738 किलो मीटरचा प्रवास करते. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांतून जातो. कोकण रेल्वेची हद्द मुंबईजवळील रोहा येथून सुरू होते ते थोकूर या मंगलोर जवळील दक्षिण कर्नाटकमधील रेल्वे स्टेशनला संपते.

1977 साली भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आले. त्यावेळचे रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी कोकण रेल्वेची संकल्पना पहिल्यांदा मांडली. त्यानुसार आपटा ते रोहा दरम्यान 15 किलो मीटर लांबीचा लोहमार्ग बांधण्यातही आला. मात्र, सरकार पडल्याने हा प्रकल्प अर्धवट राहिला.

जॉर्ज फर्नांडिस हे 1989 ते 1990 दरम्यान रेल्वे मंत्री होते. त्यावेळी ते खंबीरपणे कोकण रेल्वे झालीच पाहिजे या मताशी ठाम राहिल्यानेच कोकण रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली. त्यांनीच श्रीधरन यांची नियुक्ती करत कोकण रेल्वेच्या निर्मितीसाठी वेगळ्या महामंडळांची निर्मिती केली. त्यामाध्यमातून प्रकल्प पूर्ण केला. लोकांच्या बैठका घेऊन त्यांनी या लोकांना प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिले. 1 मे 1998 तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 760 किलो मीटर लांबीच्या कोकण रेल्वेच्या मार्गाचे उद्‌घाटन केले. यामुळे या दोन्ही नेत्यांचे कोकण रेल्वेच्या निर्मितीसाठीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)