कोंढवा बाह्यवळण रस्त्यावरील दलदल सोसवेना

संग्रहित फोटो

अवजड वाहतूक वळविल्याने मार्ग चिखलमय

कोंढवा: मंतरवाडी – कोंढवा बाह्यवळण मार्गाची दुर्दशा होऊन अक्षरशः या रस्त्याचा कोथळाच बाहेर आला आहे. जागाजागी मोठमोठे खड्डे, चिखलाची डबकी साचून दलदल तयार झाली आहे. या चिखलात असणारे खड्डयांचा अंदाज येत नसल्याने अवजड वाहनांसह कार व दुचाकींचे मोठे नुकसान होऊन अपघात घडत आहेत. पादचाऱ्यांना तर पायी चालणे कठीणच झाले आहे. त्यामुळे हा बाह्यवळण मार्ग न राहता जीवघेणा वळण मार्ग झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील अजवड वाहतूक बंद करून सर्व वाहतूक मंतरवाडी – कोंढवा बाह्यवळण मार्गावरुन वळविण्यात आली. त्यामुळे या मार्गावरून दररोज किमान दहा हजार अवजड वाहने ये-जा करत असतात. एवढी मोठी वाहतूक असताना या मार्गाच्या देखभालीकडे मात्र, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. कारण हा मार्ग मुळातच सदोष पद्धतीने निर्माण करण्यात आला होता.या मार्गावर 4-5 गावे येत असुन जागाजोगी वळण व तीव्र चढ- उतार व दाट लोकवस्ती असल्याने या रस्त्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने हा रस्ता केवळ 15-20 फुटच वाहतुकीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे कितीही वेळा दुरुस्त केला तरी त्याची क्षमताच कमी असल्याने वारंवार उखडुन खड्डयांचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करुन रुंदीकरण, अतिक्रमणे हटवून कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने करणे गरजेचे आहे.

अन्यथा हा मार्ग बाह्यवळण मार्ग न राहता जीवघेणा मार्ग झाल्याशिवाय राहणार नाही. या मार्गावर गेल्या तीन महिन्यांत शेकडो अपघात होऊन अनेक निष्पाप नागरीकांचे बळी गेले आहेत. तर कित्येकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या मार्गाची समस्या कायमची सोडवावी; अन्यथा हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)