नगर – -कॉ.ब्लादिमिर लेनिन यांनी 1917 साली रशियामध्ये पहिली कामगार वर्गाची सत्ता प्रस्थापित केली. या सत्तेने जगभरातील कामगार वर्गाला शोषणातून मुक्तीचा मार्ग दाखवला. कॉ. लेनिन हे कुठल्याही एका पक्षाचे किंवा एका देशापुरते मर्यादित नव्हते तर जागतिक कीर्तीचे महान क्रांतिकारक होते. त्यामुळे जगभर त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
जागतिक कीर्तीचे महान क्रांतिकारक व राशियन क्रांतीचे जनक कॉ. लेनिन यांची 148वी जयंती निमित्त बुरुडगाव रोड वरील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे राज्य सहसेक्रेटरी ऍड. कॉ. सुभाष लांडे पाटील यांच्या हस्ते लेनिन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ऍड.कॉ.रमेश नागवडे, कॉ. नानासाहेब कदम, कॉ. अंबादास दौंड, कॉ. कानिफनाथ तांबे, कॉ.बाबा शेख, सुनिल गोसावी, ऍड. कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. रजत लांडे आदी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या विकसनशील देशाच्या प्रगतीसाठी सोव्हिएत रशियाने मोलाची मदत केली. कॉ. लेनिन यांचे पुतळे पाडून त्यांचे विचार नाहीसे करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही उलट त्यांचे विचार आणखी लोकप्रिय होतील, असे कॉ. लांडे म्हणाले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा