कॉलेज प्रवेशाचा “कटऑफ’ वाढणार

विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली

प्रभात वृत्तसेवा
पुणे – यंदा बारावीचा निकाल एक टक्‍क्‍यांनी घसरला असला तरी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे “कटऑफ’ गुण वाढण्याची शक्‍यता असून, नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी मोठी धडपड करावी लागणार आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील वळतील. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना मात्र प्रवेशासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 5 हजार 486 एवढी आहे. गतवर्षी ही संख्या 3 हजार 890 इतकी आहे. यामुळे ही संख्या यंदा 1 हजार 596 इतकी वाढली आहे. याचाच अर्थ चांगल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी मोठी चुरस होणार असल्याची चिन्हे आहेत. यावर्षी 75 टक्‍यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 25 हजार 139 इतकी आहे. गतवर्षी ही संख्या 1 लाख 10 एवढी होती. त्यामुळे प्रवेशासाठी मोठी चुरस होणार आहे.

शाखानिहाय विचार करता गतवर्षी व यंदाही विज्ञान शाखेचा निकाल 95.85 एवढाच आहे. कला शाखेचा निकाल मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास 3 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. तथापि, वाणिज्य शाखेचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा फक्‍त 1 टक्‍क्‍यांनी कमी लागला आहे. तरीही वाणिज्य शाखेसाठी प्रवेश मिळण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण यंदा कलचाचणीचा निकालातही वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

पुण्यातही प्रवेशासाठी गुणवत्तेची स्पर्धा
पुणे विभागात 790 विद्यार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तसेच, 20 हजार 870 विद्यार्थ्यांना 75 टक्‍क्‍यांहून अधिक गुण प्राप्त झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणाचा विचार करता प्रवेश सहज मिळणे शक्‍य आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. गतवर्षी पुणे विभागात विशेष प्राविण्यासह अर्थात 75 टक्‍क्‍यांहून अधिक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 17 हजार 427 होती. यंदा मात्र ही संख्या 3 हजार 443 विद्यार्थी वाढले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी चुरस होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
———————-

5 हजार 486
90 टक्‍क्‍यांवर गुण घेणारे राज्यीाल विद्यार्थी
—————–
1 लाख 25 हजार 139
75 टक्‍यांहून अधिक गुण घेणारे विद्यार्थी
——————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)