कॉंग्रेस आमदारचे सामूहीक राजीनामास्र?

मुंबई – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारवर दबाव वाढविण्यासाठी कॉंग्रेस आमदारांनी सामूहीक राजीनाम्याची तयारी ठेवली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी विधानभवनात झालेल्या बैठकीत कॉंग्रेसच्या सर्व आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. अर्थात, कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक आज विधानभवनात पार पडली. या बैठकीत अनेक आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला. तर याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. शिवसेनेची अवस्था वरातीमागून घोडे अशी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेना गंभीर असल्यास त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असे चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)