कॉंग्रेसला रामराम; भाजपला सलाम!

वडगाव-मावळ – पक्षश्रेष्ठींच्या धोरणांवर नाराज कार्यकर्त्यांनी मावळात कॉंग्रेस (आय) पक्षाला मोठे खिंडार पाडले. त्यांनी कॉंग्रेसला रामराम, तर भाजपला सलाम केला. मंगळवार दि. 29 ला तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, किसनराव वहिले, दिलीप म्हाळसकर, शेखर वहिले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी तालुका उपाध्यक्ष आणि तालुका खरेदी-विक्री संघाचा राजीनामा तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्याकडे सुपूर्द केला होता.

भाजपचे जिल्हा अध्यक्ष आणि आमदार संजय भेगडे, मावळ भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, अविनाश बवरे, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी नगरसेवक गणेश भेगडे, चंद्रशेखर भोसले, बंडोपंत भेगडे, ऍड. दामोदर भंडारी, सोमनाथ ढोरे, सुधाकर ढोरे, किरण भिलारे, मावळ तालुका भाजपा सोशल मिडिया अध्यक्ष अनंता कुडे, किरण म्हाळसकर, महेंद्र म्हाळसकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. वडगाव नगर पंचायतीच्या प्रचाराचा शुभारंभ पोटोबा मंदिरात आमदार संजय भेगडे व पंढरीनाथ ढोरे यांचे हस्ते नारळ वाढवून झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

किसनराव वहिले यांनी वडगाव शहर कॉंगेसचे अध्यक्षपद भूषवले आहे. मात्र नगर पंचायत निवडणुका तोंडावर आल्या असताना देखील कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी अद्याप एकही बैठक बोलावली नाही. निवडणुकीचे अद्याप काहीही नियोजन नाही म्हणून पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी एक पदाधिकारी कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. येत्या दोन दिवसांत ते स्पष्ट होईल. कॉंग्रेस कोणती रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपमधील प्रवेशामुळे भाजपचे हात बळकट झाल्याचे दिसते. यावरून वडगाव नगर पंचायतीची पहिली निवडणूक कोण जिंकणार, याचा अंदाज बांधायला सुरुवात झाली आहे. अविनाश बवरे यांनी प्रास्ताविक, सुधाकर ढोरे यांनी सूत्रसंचालन व अनंता कुडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)