कॉंग्रेसच्या “जनसंघर्ष’ सभेला पुण्यातून सुरुवात

पुणे – केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी राज्यात कॉंग्रेस पक्षाने जनसंघर्ष यात्रा काढली होती. त्याच पाठोपाठ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात 50 ठिकाणी “जनसंघर्ष’ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याची सुरुवात पुण्याहून होणार आहे.

भवानी पेठेतील पेस्तंजी दवाखान्याजवळील छाया टॉकीज येथे 8 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. या सभेला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. गेल्या साडेचार वर्षांत केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारने लोकांच्या अपेक्षा भंग केल्या आहेत. सर्वच स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारचा खरा चेहरा उघड करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने “जनसंघर्ष’ सभेचे आयोजन केल्याचे या पत्रकात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)