कॉंग्रेसच्या अपप्रचाराला जशास तसे उत्तर द्या

File photo....

नितीन गडकरींचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई – राफेल प्रकरणावरून कॉंग्रेसने भाजपविरोधात देशभर रान उठवले असतानाच कॉंग्रेसच्या अपप्रचाराला जशास तसे उत्तर द्या, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. कॉंग्रेसकडून होणारे आरोप हे पूर्णपणे तथ्यहिन आहे. विमान खरेदीत कोणताही भ्रष्टचार झालेला नाही. कॉंग्रेसकडून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

राफेल विमान खरेदी प्रकरणी रिलायन्ससोबत 2012 सालीच करार झाला होता. त्यावेळी तशा बातम्याही आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यात दुरान्वयेही संबंध येत नाही. दोन देशांमधील हा करार असून भारताला आज लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सची गरज असल्याचेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने 40 हजार कोटी रूपये मंजूर केले आहेत. हा निधी प्रकल्पांना तातडीने मिळावा यासाठी देखील पावले उचलण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)