कैलासभक्तांना दिलासा : मानसरोवर यात्रा जाणार आसाममधून

बीजिंग : डोकलाम वादानंतर कैलास मानसरोवर यात्रेला आसाममधील नाथुला मार्गे नेण्यास बंदी घातली होती. मात्र, आता या मार्गावरून ही यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी माहिती दिली आहे.

स्वराज या सध्या चीन दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

नाथुला येथून जाणाऱ्या या मार्गावरुन आता पुन्हा एकदा कैलास मानसरोवर यात्रा सुरु करण्यात येणार असल्याने भाविकांना दिलासा मिळाला आहे. यंदाची यात्रा भाविकांसाठी एक चांगला अनुभव असेल. तसेच यामध्ये चीनदेखील भाविकांना सहकार्य करेल, अशी आशा सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)