कैरानामध्ये दलित-मुस्लिम भागात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड

उत्तर प्रदेश : कैराना आणि नुरपूर पोटनिवडणुकी दरम्यान ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. कैरानातल्या दलित-मुस्लिम भागात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. भाजपाने या ईव्हीएम मशिनबरोबर छेडछाड केल्याचा आरोपही केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीनं तक्रार करत दोन्ही जागांवरच्या पोटनिवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे.

पराभवाच्या भीतीने भाजपाने ईव्हीएम मशिनबरोबर छेडछाड केल्याची टीकाही सपाने केली आहे. माझ्या लोकसभा निवडणूक क्षेत्राला प्रभावित केले जात असल्याचा आरोप आरएलडी उमेदवार तबस्सुम हसन याने लावला आहे. स्थानिक प्रशासन दबावात काम करत असल्याचेही चर्चा आहे. दलित, मुस्लिम आणि जाटबहुल भागात ईव्हीएममध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कैरानातल्या दलित-मुस्लिम भागात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड करण्यात आला आहे. इतर ठिकाणी तसा कोणताही गोंधळ नाही. माझा विजय होऊ नये, यासाठीच भाजपा प्रयत्नशील असल्याचा आरोप तबस्सुमने केला आहे. तबस्सुमनं यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. तबस्सूमनं कैराना लोकसभा क्षेत्रातील गंगोह, नकुड आणि शामली भागातील बूथमधल्या ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परंतु भाजपानं या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. भाजपा उमेदवार मृगांका सिंह यांनी ईव्हीएम मशिनमध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचं सांगत समाजवादी पार्टीचे आरोप फेटाळून लावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)