केवळ 13 हजार कोटींची नोटबंदी…

देशाचे मात्र प्रचंड नुकसान – चिदंबरम
नवी दिल्ली – 99.3 टक्के नोटा परत आल्या असल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने घोषित केल्यानंतर त्यावरून माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की या नोटांपैकी केवळ 13 हजार कोटी रूपये परत आलेले नाहींत म्हणजे मोदी सरकारची ही नोट बंदी केवळ 13 हजार कोटी रूपयांचीच ठरली. पण त्यामुळे संपुर्ण देशाचे लाखो कोटी रूपयांचे नुकसान झाले.

लक्षावधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून त्यामुळे हजारो उद्योग बंद पडले आहेत. मोदी सरकारच्या या नोटबंदीच्या अवास्तव धाडसाचे मोठे परिणाम देशाला भोगावे लागले आहेत असे चिदंबरम यांनी आपल्या ट्‌विटर अकौंटवर म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चिदंबरम यांनी म्हटले आहे की नोटबंदीमुळे देशाच्या जीडीपीत दीड टक्के घट झाली. म्हणजेच त्यातून वर्षाला देशाचे तब्बल 2 लाख 25 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. नोटबंदीच्या काळात बॅंकांमध्ये पैसे बदलून घेण्यासाठी जी गर्दी उसळली होती त्यात शंभरावर लोकांचे बळी गेले आहेत. रोजंदारीवरील मजुरांचा पंधरा कोटी दिवसांचा रोजगार बुडाला आहे.

लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील या काळात बंद झालेले कारखाने अजून सुरू झालेले नाहींत. देशात नोटबंदीच्या आधी हजार आणि पाचशे रूपयांच्या 15 लाख 42 हजारांच्या नोटा वापरात होत्या. त्यापैकी केवळ 13 हजार कोटी रूपये सोडून जवळपास प्रत्येक नोट बॅंकेत परत आली आहे. पण सरकारला मात्र तीन लाख कोटी रूपये परत येणार नाहीत असे वाटले होते पण तसे झालेले नाही असेही चिदंबरम यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)