केवळ दोन तासात वेचला तीन ट्रॉली कचरा

गोंदवले बुद्रुक : स्वाइन फ्लू आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान राबवले. (छाया ः संदीप जठार)

गोंदवले बु।। ग्रामस्थांनी केले गाव चकाचक

गोंदवले, दि. 27 (प्रतिनिधी)- जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने रोगराईच्या अटकावासाठी गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीने ग्राम स्वच्छतेसाठी दिलेल्या हाकेला ग्रामस्थ धावून आले. अवघ्या दोन तासातच तीन ट्रॉली कचरा गोळा करून संपूर्ण गाव चकाचक करण्यात आला.
शासनाच्या परिपत्रकानुसार नेहमीच सगळीकडे स्वच्छता अभियान राबविले जाते. पण आरोग्यासाठी आपला परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे, हा विचार ग्रामपंचायतीने ग्रामस्थांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात स्वाइन फ्लू तसेच इतर आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सध्याचे वातावरण आजार पसरण्यास अनुकूल आहे. त्यामुळे गाव व परिसर स्वच्छ ठेवून आजारांना अटकाव करावा, यासाठी ग्रामपंचायतीने आज अचानक ग्रामस्वच्छता अभियान राबवले. यात सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनाला साथ देत नवचैतन्य हायस्कुल, गाडगे महाराज आश्रमशाळा, छत्रपती अकॅडमी तसेच गावतील विविध मंडळांनी सहभाग घेतला. ग्रामपंचायतीने यावेळी हातमोजे व तोंडाला बांधण्यासाठी स्कार्फ दिले होते. माण नदीलगतच्या स्मशानभूमी परिसरपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. येथील बाजारतळा जवळच्या अंगणवाडी परिसरात मोठया प्रमाणात साचलेली घाण काढल्याने परिसर सुंदर बनला. स्वच्छता करण्यासाठी सर्वजण गावात विविध ठिकाणी काम करत होते. त्यामुळे अवघ्या दोन तासातच सुमारे तीन ट्रॉली कचरा गोळा करून गाव स्वच्छ करण्यात आला. यावेळी सरपंच अश्विनी कट्टे, उपसरपंच संजय माने, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष कट्टे, अंगराज कट्टे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी अमोल पवार उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)