केळीच्या गाभ्याचे औषधी उपयोग

सुजाता टिकेकर

केळीचे काल म्हणजे गाभा, हा अतिशय थंड असूनही अतिशय उपयोगी असतो. याचे अनेक औषधी उपयोग आहेत.
रक्तिसार, तांबडा आमांशावर – रक्तिसार, तांबडा आमांश झाला असेल त्यान केळीच्या कालाची भाजी खावी. अंगाचा दाह होऊन काही वेळा खूप तहान-तहान होते. अशा वेळी केळीच्या कालाचा रस दोन चमचे चिमुटभर साखर घालून घ्यावा, त्याने दाह थांबतो. तसेच तहानही कमी होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मूत्रकृच्छ्रावर – मूत्रकृच्छ्र म्हणजे मूत्र कोंडणे, मूत्र अडणे ह्यावर केळीचे काल फार चांगले औषध आहे. मूत्राच्या सर्व प्रकारांच्या विकारावर कालाचा रस उत्तम आहे. तो नियमित घ्यावा.
अंगावरून पांढरे जात असल्यास – तीन छोटे चमचे केळीच्या खुंटांचा आतील गाभ्यातील रस घ्यावा. ताबडतोब श्‍वेतप्रदर म्हणजे पांढरी धुपणी असेल तर ती थांबते.

रक्तपित्ताच्या विकारावर – रक्तपित्त म्हणजे नाकाचा घोळणा फुटून रक्त जाणे, किंवा तोंडातून रक्त जाणे हे विकार ज्यास असतील त्याने केळीच्या कालाचे पाणी चार ग्रॅम, आवळ्याचा रस दोन ग्रॅम, थोडी साखर घालून रोज घेत जावा. म्हणजे रक्तपित्त कमी होते.

हाडापर्यंत गेलेल्या व्रणासाठी – काही वेळा व्रण होऊन तो चिरत चिरत हाडापर्यंत जातो. या व्रणातून हाडांचा नाश होऊ लागतो. अशावेळी केळीचे काल फार गुणकारी आहे. 6 ग्रॅम कालाचा रस, 1 ग्रॅम हळद घालून घ्यावा. अलवणी म्हणजेच अळणी पथ्याने चाळीस दिवस राहिले तर हाडाच्या जखमेतील व्रण सुकू लागतो.

कानातून पू येत असल्यास – कानातून पू येत असल्यास केळीच्या पानाने कान धुवावा. पू येणे बंद होते.
खरूज किंवा अंगावर मोठे फोड आले असता – खरूज किंवा अंगावर मोठे मोठे फोड उठले असता केळीच्या गाभ्याचा रस 6 ग्रॅम घेऊन त्यात थोडी साखर घालून नियमित घ्यावा, खरूज बरी होते. अंगावरील फोडही जातात.

मधुमेहावर – केळीच्या गाभ्याचा रस रोज नियमित अनाशेपोटी घ्यावा. त्यामूळे मधुमेहातील शर्करा नियंत्रित व्हायला मदत होते.

किडनीच्या विकारावर – केळीच्या गाभ्याचा रस रोज नियमित अनाशेपोटी घ्यावा.त्यामूळे किडनीचे कार्य व्यवस्थित होण्यास मदत होते.अशाप्रकारे केळीचा गाभा हा अत्यंत गुणकारी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)