केळवडेत मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन

कापूरहोळ- नवसह्याद्री अभियांत्रिकी महाविद्यालय, केळवडे (ता. भोर) येथे इम्फोसिस कंपनीच्या मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस ड्राईव्हला पुणे रिजन, तसेच सातारा, सांगली रिजनमधील तंत्रशिक्षण आणि अभियांत्रिकीचे जवळपास एकूण 400 पेक्षा जास्त विद्यार्थी हजार होते.
चहिरीळी ही एक अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कंपनी असून कंपनीच्या वेगवेगळ्या देशात 300 पेक्षा जास्त कार्यालय आहेत, तर जवळपास 21 हजार 994 कर्मचारी फक्त भारतात कार्यरत आहेत. चहिरीळी या कंपनी चा 60 टक्के पात्रतेचा आणि कोणताच विषय बॅकलॉग नसल्याची अट आहे. कंपनीच्या विविध शाखेत विद्यार्थ्यांना या कंपनीमध्ये काम करण्याची संधी असल्याने मोठ्या प्रमाणात मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद या मेगा कॅम्पस ड्राईव्हला दिसून आला.
कंपनीच्या वतीने सर्व प्रथम ग्रुप डिस्कशन, त्यानंतरटेस्ट आणि पर्सनल मुलाखात असे तीन राऊंड पार पडले. या कॅम्पस ड्राईव्ह ला कंपनीच्या दोन तज्ज्ञ व्यक्तींनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे परीक्षण केले. मेगा कॅम्पस ड्राईव्हच्या यशस्वीतेसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे राहुल मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मुखर्जी, प्रा. किमया समर्थ, प्रा. डहाके, प्रा. जाधव यांनी परिश्रम घेतले.
ज्या मुलाझमुलींनी निवडीसाठी सहभाग घेतला होता त्या विद्यार्थ्यांचे नवसह्याद्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थाप्रमुख पोपटराव सुके, प्राचार्य डॉ. रुपेश पाटील, तसेच सर्व विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)