केळगावात जुन्या-नव्या शिक्षकांचा गौरव

चिंबळी- केळगाव (ता. खेड) येथे ग्रामपंचायतीच्या व शाळा समितीच्या वतीने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून मे महिन्यात प्रशासकीय पद्धतीने बदली झालेल्या जिल्हा परिषद शाळेतील जुन्या व नव्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यात वर्ग शिक्षक विनोद चव्हाण, रेखा चव्हाण, कुंडलिक सातकर, विजया म्हसे, सपना पवार व सेवानिवृत झालेल्या मुख्याध्यापिका काशिद तसेच नवीन आलेल्या वर्ग शिक्षिका सुनिता भगत, अलका राहणे, मनिषा मटाले, मधुर आढारी, नेहा लगड, स्मिता तावरे यांना तुकाराम गाथा व ज्ञानेश्‍वरी ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी हभप शिवाजी मुंगसे, उपसरपंच मनोज मुंगसे, शाळा समितीचे अध्यक्ष संदिप गुंड, ग्रामपंचायत सदस्य संतोष गुंड, विठाबाई गुंड, पांडुरंग मुंगसे, पोलीस पाटील युवराज वहिले, सुनिल मुंगसे, शाळा समितीच्या उपाध्यक्षा शिल्पा भांडवलकर, शिवाजी सुर्वे, शिवराम भांडवलकर, गणेश सोनावणे काळूराम धुमाळ, सुदाम गुंड आदि मान्यवरांसह सर्व शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विनोद चव्हाण, कुंडलिक सातकर, व बदलून गेलेल्या शिक्षकांच्या वतीने एक सामाजिक कार्य म्हणून शाळेसाठी पाच हजार रुपायांची देणगी देण्यात देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग शिक्षक शरद कुऱ्हाडे, तर मधुकर आढारी यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)