केरळ, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये रुग्णसंख्येत वाढ

महाराष्ट्रात दैनंदिन नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ

नवी दिल्ली – देशातील काही राज्यांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. केरळ, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसत आहे. केरळमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या सात दिवसांमध्ये, छत्तीसगडमध्ये देखील दैनंदिन नवीन सक्रीय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात, दैनंदिन नवीन रुग्णसंख्येची नोंद 259 इतकी झाली आहे.

मागील आठवड्यामध्ये, महाराष्ट्रात दैनंदिन नवीन रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे, तसेच देशात आज सर्वाधिक रुग्णसंख्या देखील या राज्याची आहे. राज्यात गेल्या 24 तासात दैनंदिन नवीन रुग्णसंख्या 6,112 इतकी आहे. महाराष्ट्राबरोबरच पंजाबमध्ये देखील अचानक दैनंदिन रुग्ण संख्येत गेल्या 7 दिवसात वाढ झाली असून गेल्या 24 तासात 383 इतकी दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या आहे.

13 फेब्रुवारीपासून, मध्यप्रदेशमध्ये देखील दैनंदिन नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात दैनंदिन नवीन संख्या 297 इतकी नोंदविली गेली आहे. विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आणि रोगाचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यासाठी कोविड संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे महत्व पुन्हा एकदा प्रभावीपणे सांगितले जात आहे. चांगल्या दर्जाच्या पायाभूत आरोग्य सुविधा आणि टेस्ट – ट्रॅक – ट्रीट पद्धत यामुळे 21 कोटीपेक्षा अधिक चाचण्या देशभरात घेण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय बाधित रुग्णांच्या संचयी दरामध्ये गेल्या 13 दिवसांमध्ये सातत्याने घट दिसून आली आहे. सध्या तो 5.22 टक्के इतका आहे.

ज्या लाभार्थ्यांनी लसीकरणाची पहिली मात्रा घेऊन 28 दिवस झाले आहेत, अशांसाठी कोविड 19 लसीकरणाची दुसरी मात्रा देण्यास 13 फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला. अग्रभागी राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 2 फेब्रुवारी पासून लसीकरणास प्रारंभ झाला आहे. 9 राज्यांमध्ये लसीकरणाच्या प्रत्येकी 5 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात सातत्याने नव्याने मोठ्यासंख्येने रुग्ण आढळले आहेत, ती संख्या आता 7000 इतकी आहे. त्यानंतर केरळमध्ये 4,505 इतकी तर तामिळनाडूमध्ये 448 नवीन रुग्णांची नोंद आहे. केवळ महाराष्ट्र आणि केरळमध्ये 75.87 टक्के इतकी सक्रीय रुग्णांची संख्या आहे.
गेल्या 24 तासात एकूण 101 मृत्यूंची नोंद झाली आहे. नवीन मृत्यूपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 44 इतके मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये 15 तर पंजाबमध्ये 8 मृत्यूंची नोंद झाली आहे.

आतापर्यंत एकूण 1.06 कोटी लोक बरे झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 97.27 टक्के इतका आहे. केरळमध्ये नव्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे 4,854 इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासात 2,159 इतके रुग्ण बरे झाले आहेत, तर तामिळनाडूमध्ये त्यानंतर 467 इतकी संख्या आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.