केरळ मदतनिधीचा “दिखावा’?

भाजपचा पुढाकार : राष्ट्रवादी, सेना, मनसेचे पत्र नाही

पिंपरी – अतिवृष्टीमुळे केरळात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने केरळवासीयांना पिंपरी-चिंचवडच्या सर्वपक्षीय नगरसेवकांचे मानधन मदतनिधी म्हणून देण्याचा निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. परंतु, सत्ताधारी भाजप वगळता राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेचे मानधन देण्याबाबतचे अधिकृत पत्र अद्याप लेखा विभागाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे विरोधकांचे मानधन केरळवासीयांना देणार की नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला आहे. केरळवासीयांना मदतीची गरज असून सर्वांनी मदत करावी, असे आवाहन मूळचे केरळचे असलेले नगरसेवक बाबू नायर यांनी केले. त्यानुसार सर्वपक्षीय नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन केरळ पुरग्रस्तांना मदत निधी म्हणून देण्याचे जाहीर केले. महापालिकेत निवडून आलेले 128 नगरसेवक आहेत. तर, पाच स्वीकृत नगरसेवक असे एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यांचे एका महिन्याचे मानधन मिळून 19 लाख 95 हजार रुपये निधी होतो. मात्र, आतापर्यंत महापालिकेच्या लेखा विभागाला फक्त भाजप पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडून पत्र प्राप्त झाले आहे.

भाजपचे 80 नगरसेवक आणि अपक्ष 5 अशा एकूण 85 नगरसेवकांचे मानधन देण्याबाबत त्यांनी कळविले आहे. मात्र, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे गटनेत्यांकडून अद्याप कुठलेही पत्र लेखा विभागाला मिळालेले नाही. त्यामुळे या पक्षांचे नगरसेवक केरळसाअठी मानधन देणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)