केरळ पूरग्रस्तांच्या आरोग्यसेवेसाठी गेलेले महाराष्ट्राचे वैद्यकीय पथक आज परतणार

मुंबई: केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या १०० तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आज, सोमवार दि. २७ ऑगस्ट रोजी मुंबईत परतणार आहे.  दुपारी २ वाजता भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने ड्रम गेट ( गेट क्र. ८), कलिना, सांताक्रूझ येथे या वैद्यकीय पथकाचे आगमन होणार आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. २० ऑगस्ट  रोजी वायुदलाच्या विशेष विमानाने १०० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे हे पथक केरळला रवाना झाले होते. या पथकाने केरळातील पठणमथीट्टा,एर्नाकुलम,त्रिचूर, अल्लेप्पी या जिल्ह्यात  २० हजार ४०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. त्याशिवाय हजारो रुग्णांचे मानसिक समुपदेशन केले. या मदतकार्यात सुमारे ४ टन औषधांचा साठा महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जे.जे. हॉस्पिटल,मुंबई तसेच ससून हॉस्पिटल, पुणे येथील तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या या पथकाने केरळच्या गावागावात जाऊन दर्जेदार आरोग्यसेवा पुरविली. या आरोग्य सेवेबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी या पथकाचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)