केरळातील पुरग्रस्तांची राहुल यांच्याकडून विचारपुस

चेंगन्नुर – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळातील पुरग्रस्त भागाचा दौरा करून तेथील स्थितीची पहाणी केली. त्यांनी आज येथील पुरग्रस्तांच्या छावणीलाही भेट देऊन तेथील लोकांची विचारपुस केली. ते या राज्याच्या दोन दिवसांच्या पहाणी दौऱ्यासाठी आले आहेत. त्यांचे सकाळी थिरूवनंतपुरम विमानतळावर आगमन झाले त्यानंतर हेलिकॉप्टरने ते अलपुुझ्झा जिल्ह्यातील चेंगन्नुर येथील मदत छावणी कडे गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ख्रिश्‍चन कॉलेजातील मदत छावणीतही जाऊन त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत केरळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते रमेश चेन्नीथला, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष एम. एम हसन आणि अन्य स्थानिक नेते उपस्थित होते. या पुरग्रस्तांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि मच्छिमारांचीही ते भेट घेणार आहेत. केरळच्या पुरात आत्ता पर्यंत एकूण 474 जण दगावले असून पंधरा जण अद्याप बेपत्ता आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)