केरळमध्ये मान्सून वेळेपूर्वीच पोहचला

पण हवामान खाते – स्कायमेट वेदरमध्ये मतभेद
नवी दिल्ली – केरळमध्ये मान्सून तीन दिवस अगोदर, मंगळवारी पोहचला आहे. आयएमडी (भारतीय हवामान खाते) ने तशी घोषणा केली आहे. उलट स्कायमेट वेदरने सोमवारी, म्हणजे 24 तास अगोदरच केरळमध्ये मान्सून पोहचल्याची घोषणा केली आहे

केरळमध्ये मान्सून पोहचणे ही देशात चार महिने चालणाऱ्या पावसाळ्याची नांदी समजली जाते. या वर्षी केरळमध्ये मान्सून पोहचण्यचा अंदाजित दिवस 1 जून होता. पण तीन दिवस अगोदर मंगळवारी केरळमध्ये मान्सून पोहचला आहे. पुढे संपूर्ण देशात मान्सून सक्रिय होण्यासाठी सुमारे दीड्‌ महिन्याचा कालावधी लागतो. या वर्षी सरासरीप्रमाणेच पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जून महिन्यात देशातील 80 टक्के भागात पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मान्सूनचे आगमन घोषित करण्यासाठी काही मानके निश्‍चित करण्यात आलेली आहेत. राज्यातील 14 उपलब्ध केंद्रांपैकी 60 टक्के केंद्रांत 10 मे नंतर सलग दोन दिवस 2.5 मिमी वा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली तर मानसूनची घोषणा केली जाते. पश्‍चिमी वारे समुद्रतळापासून 15,000 फुटांपेक्षा अधिक उंचावर असणेहे देखील एक मानक आहे. अशा सर्व आवश्‍यक मानकांचा अभ्यास केल्यानंतरच केरळमध्ये मान्सून आल्याची घोषणा करण्यात आली असे हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी म्हटले आहे.

स्कायमेट वेदरने सोमवारी, म्हणजे 24 तास अगोदरच केरळमध्ये मान्सून पोहचल्याची घोषणा केली होती, तेव्हा हवामान खात्याने पुढील 24 तासात केरळमध्ये मान्सून पोहचेल असे म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)