केमिस्ट बंदला संमिश्र प्रतिसाद

मोठ्या हॉस्पिटल्सचे मेडिकल सुरू : एफडीए नियंत्रण कक्षाकडून नागरिकांना मदत

पुणे – ऑनलाईन औषध विक्रीला विरोध करण्यासाठी केमिस्ट असोसिएशनकडून पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळालेला पहायला मिळाले. जवळपास सर्वच खासगी मेडिकल्स शुक्रवारी बंद असलेली पहायला मिळाली मात्र अनेक मोठ्या रुग्णालयांची मेडिकल्स सुरू असल्याने रुग्णांना त्याचा लाभ झाला. तर, अन्न व औषध प्रशासकडून सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाकडूनही नागरिकांना मदत करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑनलाईन औषध विक्रीचा कायदा येत्या काही दिवसांत येऊ घातला असून यासाठी केंद्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका असण्याबरोबरच स्थानिक व्यावसायिकांवर गदा येण्याची शक्‍यता असल्याचे सांगत केमिस्ट असोसिएशन्सने शुक्रवारी भारत बंद पुकारला होता. आमचा ग्राहकांना त्रास देण्याचा हेतू नसून सरकारी कृतीला विरोध असल्याचे सांगत हा बंद करण्यात आला होता. दरम्यान, यावेळी शहरातील मोठ्या रुग्णालयांची मेडिकल्स सुरू तर होतीच परंतु ग्रामीण भागात या बंदचा फारसा परिणाम पहायला मिळाला नाही. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मेडिकल्स सुरूच होती.

दरम्यान, ज्या रुग्णांना औषध मिळण्याबाबत अडचणी होत्या अशा सहा ते सात जणांनी अन्न व औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला व त्यांना औषध उपलब्ध झाले असल्याची माहिती प्रशासनाचे सहायक आयुक्‍त र. पा. चौधरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)