‘केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट’चे कराडात ठिय्या आंदोलन

कराड दि. 28 (प्रतिनिधी) – किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी आणि ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात औषध विक्रेत्यांच्या एकदिवशीय देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्य केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोशिएशनच्या वतीने कराडात तहसील कचेरीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर नाका येथील औषधविक्रेते केमिस्ट भवनपासून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सुमारे 100 ते 150 औषधविक्रेते सहभागी झाले होते. आंदोलनावेळी केमिस्ट एकता जिंदाबाद, ऑनलाईन औषधविक्री बंद करा, कहा गये-कहा गये अच्छे दिन कहा गये, ई – पोर्टल का विचार केमिस्टो को नही स्वीकार, ऑनलाइन फार्मसी चं करायचं काय अशा घोषणा देण्यात आल्या. नायब तहसीलदार मिनल भोसले व पंचायत समितीच्या सभापती फरीदा इनामदार यांना संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
तालुकाध्यक्ष सागर पाटील म्हणाले, आपला बंद आपल्या फायद्यासाठी नसून ऑनलाईन फार्मसीमुळे समाजाचे नुकसान होणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मिळणारी औषधे सहजरित्या मिळणार असल्याने समाजातील तरुण पिढी वाईट गोष्टींना बळी पडणार आहे. एखाद्या व्यक्तीला रात्री अवेळी मिळणारे औषध मिळणार नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे ऑनलाईन फार्मसी बंद झाली पाहिजे. ठिय्या आंदोलनास आ. आनंदराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक राजेंद्र यादव यांनी भेट दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)