केमिस्टची भारत बंदची हाक

ऑनलाईन औषध विक्रीला विरोध : ग्राहकांना बसणार फटका

पुणे – ऑनलाईन औषध विक्रीला विरोध करण्यासाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने आज (28 सप्टेंबर) रोजी संपूर्ण भारतभर एक दिवसीय संप पुकारला आहे. दरम्यान, या संपाचा ग्राहकांना फटका बसू नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाकडून शासकीय तसेच निमशासकीय रुग्णालयातील डॉक्‍टरांना पुरेसा औषधसाठा करण्यास सांगितले आहे, तसेच यासाठी नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येत्या काळात केंद्र शासनाकडून औषधांची ऑनलाईन विक्री करण्याबाबत कायदा आणला जाण्याची शक्‍यता आहे. याबाबत 28 ऑगस्ट रोजी शासनाने पत्र काढत ऑनलाईन विक्री होण्याच्या दृष्टीकोनातून एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याचाच निषेध करण्यासाठी हा बंद पुरण्याचा निर्णय असोसिएशनकडून घेण्यात आला आहे. याबाबत असोसिएशनचे पुण्याचे अध्यक्ष सुशील शहा, वैद्यनाथ जागृष्टे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

जागुष्टे म्हणाले, हा कायदा केला जाऊ नये यासाठी आम्ही शासनाला अनेक पत्र दिली परंतु त्यावर कोणतेही उत्तर न देता शासन या ऑनलाईन औषध विक्रीच्या दिशेने रोज नवे पाऊल पुढे टाकत आहे. अन्न व औषध प्रशासनाने केवळ नोंदणी करण्याची परवानगी दिली असून कोणताही परवाना दिलेला नसतानाही सध्या ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनानेच शासनाला एक अहवाल पाठविला असून ऑनलाईन औषध विक्रीमध्ये कशा प्रकारे चुकीच्या गोष्टी होतात याची काही उदाहरणे दिली आहेत. शासनाने त्याचा गांभिर्याने विचार करावा. भविष्यात शासन जर कायद्याच्या निर्णयापर्यंत आले तर आम्ही या विरोधात न्यायालयात जाण्याचीही तयारी दाखवू, असेही जागुष्टे यांनी सांगितले.

बंदच्या पार्श्‍वभूमीवर एफडीएचा नियंत्रण कक्ष
औषध विक्रेत्या संघाने पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाकडून सर्व खासगी, शासकीय, निमशासकीय रुग्णालयांत औषधसाठा करून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच यासाठी प्रशासनातर्फे खास नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच मेल आयडी दिले आहेत. ग्राहकहित लक्षात घेता पुण्यातील केमिस्टला या संपात सहभागी न होण्याचे आवाहन देखील प्रशासनाचे सहाआयुक्‍त स.मा. साक्रीकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)