केबीडीपीला सेफ्टी दरवाजा नाही

ओझर्डे ः डीपीला सेफ्टी दरवाजा नसल्याने दुर्घटना होण्याची शक्‍यता आहे.

वितरणाच्या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्‍त
ओझर्डे, दि. 26 (वार्ताहर) – ओझर्डे भुईंज दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या फ्युजबॉक्‍सला दरवाजाच राहिला नसल्याने याठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र याप्रकाराकडे वीज वितरण विभागाने दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संतापाची लाट उसळली असून वीज वितरणने तात्काळ या फ्युजबॉक्‍सला दरवाजा बसविण्याची मागणी होत आहे.
ओझर्डे भुईंज वाट शिवारात बाळासाहेब शिंदे यांच्या शेतजमिनी शेजारच्या रहदारीच्या रस्त्यात ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरच्या फ्युजबॉक्‍सला सेफ्टीसाठी दरवाजा लावला जातो. मात्र, याठिकाणी लावण्यात आलेल्या दरवाजाची दुरवस्था झाली असून हा दरवाजा सताड उघाडच असतो. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी बावधन परिसरातील गावामध्ये शेतात गेल्या एका जवाना वीजेचा करंट बसून आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर वीज वितरणला शहाणपण येईल, अशी आशा ग्रामीण भागातील जनतेला होती. मात्र, सध्याही तालुक्‍याच्या ग्रामीण भागात शेतीपंपासाठी बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या फ्युजबॉक्‍सची दुरवस्था जशीच्या तशी आहे. भुईंज ओझर्डे या रस्त्यावर ट्रान्सफॉर्मरच्या फ्युजबॉक्‍सबाबतही संबंधित विभागाने तक्रारींनंतरही दखल घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
या धोकादायक ट्रान्सफॉर्मरमुळे येथील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे वीज वितरणने तात्काळ या फ्युजबॉक्‍सला दरवाजे बसविण्याची मागणी होत आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या उद्रेकाला सामोरे जा, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांनी ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी वीज वितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत. मात्र तरीही वीज वितरणकडून ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, ही खेदाची बाब आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)