केबलला आग ; प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली

थेरगाव – पद्‌मजी पेपरमिलच्या समोरील रस्त्यालगतच्या चेंबर मधील केबलला गुरुवारी (दि. 22) रात्री अचानकपणे आग लागली. आगीचे लोटच्या लोट उंच उंच दिसू लागले.

लवकुश मित्र मंडळाचे संचालक जयपाल गायकवाड, थेरगाव सोशल फाउंडेशनचे अनिल घोडेकर व युवराज पाटील यांनी याठिकाणी धाव घेत अग्निशमन दलाला माहिती दिली. तत्पूर्वी लवकुश मित्र मंडळ, बजरंग दल, दत्तनगर व पद्‌मजी पेपर मिलच्या सुरक्षा रक्षकांनी आगीवर माती टाकून आग विझविण्याचा प्राथमिक प्रयत्न केला.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले. पद्‌मजी पेपर मिल मधील कामगारांच्या गाड्या व मालवाहतुकीचे ट्रक आगीपासून वाचवत येथून हलविण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आग पुर्णपणे विझल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here