केईएम रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरची आत्महत्या

मुंबई – मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरने आपल्या घराच्या छतावरुन उडी मारत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ओंकार महेश ठाकूर (21) असे या डॉक्‍टरचं नाव आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ओंकार ठाकूर हे दादर पश्‍चिमेकडील कोहिनूर टॉवरमध्ये वास्तव्यास होते. ठाकूर हे केईएम हॉस्पिटलमध्ये फिजीओथेरपीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारली. यानंतर त्यांना तातडीने सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तपासणीअंती डॉक्‍टरांनी त्याना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.