केंद्र सरकारची फेसबुकला दुसरी नोटीस

नवी दिल्ली : डेटा लिक प्रकरणात केंद्र सरकारने आता फेसबुक आणि कॅम्ब्रिज अनालिटीकाला दुसरी नोटीस पाठवली असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारकडून पाठवण्यात आलेल्या पहिल्या नोटीसीला या दोन्ही कंपन्यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याने ही नोटीस देण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.

फेसबुक आणि कॅम्ब्रिज अनालिटीकाला केंद्र सरकारने पहिली नोटीस पाठवली त्याला अत्यंत संक्षिप्त स्वरुपात उत्तरे देण्यात आल्याने ही दुसरी नोटीस पाठवण्यात आले आहे. या नोटीसीला १० मे पर्यंत या दोन्ही कंपन्यांना उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. सरकारने पहिल्या नोटीसीला ३१ मार्च पर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र कंपनीकडून उत्तर देण्यासाठी आणखी वेळ मागून घेतला होता त्यानुसार सरकारने त्यांना ७ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा सरकारने फेसबुकला नोटीस पाठवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)