केंद्र सरकारकडून फाशीच्या शिक्षेचे समर्थन

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेचे जोरदार समर्थन केले. मृत्यूदंडाच्या अंमलबजावणीसाठी प्राणघातक इंजेक्‍शन आणि बंदुकीच्या गोळीचा वापर हे पर्याय कमी यातनादायी नसल्याची भूमिका सरकारकडून मांडण्यात आली. एका याचिकेवरून न्यायालयाने मृत्यूदंड ठोठावण्यात आलेल्या दोषीला यातनादायी नव्हे तर शांततेत मरण देण्यासाठी कायद्यात बदल करण्याविषयी विचार करण्याची सूचना सरकारला केली होती.

त्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र सादर करून सरकारची भूमिका स्पष्ट केली. फासावर लटकावण्यामुळे होणारा मृत्यू जलद आणि साधा असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले. प्राणघातक इंजेक्‍शन आणि गोळीबार या प्रकारांचे दोषही मंत्रालयाने दाखवले. इंजेक्‍शनमध्ये वापरले जाणारे रसायन सार्वजनिक झाल्यास त्याचा गैरवापर होऊ शकेल, याकडेही मंत्रालयाने लक्ष वेधले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)