केंद्राच्या प्रभावी योजनांतून सर्वसामान्यांना दिलासा 

आमदार बाळासाहेब मुरकुटे : उज्ज्वला दिनानिमित्त नेवासे येथे 125 कुटूंबांना गॅस वितरण
नेवासे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबविलेल्या प्रभावी योजनांमधून सर्वसामान्यांना दिलास मिळत आहे. अशाच उज्ज्वला गॅस वितरण योजनेतून देशभरातील कोट्यवधी सर्वसामान्य महिलांची चुलीच्या धुरातून मुक्‍तता झाल्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले.
शहरातील रघुजन गॅस सर्व्हिसच्या वतीने उज्ज्वला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात 125 सर्वसामान्य कुटूंबांना गॅस वितरण केले. त्यावेळी आ. मुरकुटे बोलत होते.
यावेळी निवासी नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर, पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब पटारे, नगराध्यक्षा संगीता बर्डे आदी प्रमुख उपस्थित होते. रघुजन गॅस सर्व्हिसेसचे मुख्य संचालक डॉ. लक्ष्मणराव इंगळे यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
आ. मुरकुटे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रभावी योजनेतून सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारे कार्य केले. याआधी चूल व धूर यामुळे सर्वसामान्य कुटूंबाचे जीवन घातक बनले होते. पंतप्रधान मोदी यांनी यावर पर्याय म्हणून उज्ज्वलासारखी योजना सुरू करून पर्याय दिला. 100 रुपयांच्या सहभागातून गोरगरीब गरजूंसाठी ही योजना सुरू केली.
यावेळी कर्मचारी अजय शिंदे यांनी गॅस वापराबाबत घ्यावयाची काळजी याविषयी प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली. यावेळी नगरसेवक सुनील वाघ, पुरवठा निरीक्षक बुद्धानंद धांडोरे, विनायक गोरे, कावेरी शिंदे, रमहूभाई पठाण, डॉ. लक्ष्मणराव खंडाळे, भानसहिवऱ्याचे सरपंच देविदास साळुंके, न. मा. पाटील कडू, लायन्स क्‍लबचे माजी अध्यक्ष बाळासाहेब डहाके, नगरसेवक दिनेश व्यवहारे, डॉ. सचिन सांगळे, सचिन नागपुरे, भारत डोकडे, रणजित सोनवणे, सुनील धायजे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)