केंद्राच्या जमिनीवरील रखडलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा तोडगा दिल्लीत

मुंबई – मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या अखत्यारीत असलेल्या 517 एकर जमिनींवर वसलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. या रखडलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा तोडगा आता दिल्लीत निघणार आहे. संबंधित विभागांसोबत राज्याची बैठक घेऊन लवकरच तोडगा काढण्याचे निर्देश केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले.

गांधीनगर (गुजरात) येथे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पश्‍चिम क्षेत्रीय परिषदेची 23 वी बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेसह मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या प्रश्नावर भूमिका मांडली. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी निर्देश दिले. फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गोव्याचे मंत्री विनोद पालिनकर, दीव-दमणचे प्रशासक प्रफुल्ल पटेल आदी या परिषदेस उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या विविध 11 विभागांची मिळून मुंबईमध्ये एकूण 517 एकर जमीन आहे. यातील काही ठिकाणी गेले कित्येक वर्षे झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. आता या जागेवरील झोपडपट्ट्या पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. परंतु, या जमिनी वेैंद्र सरकारच्या ताब्यात असल्याने त्यांची परवागनी आवश्‍यक आहे. आज झालेल्या बैठकीत अशा प्रकरणांमध्ये त्वरित मार्ग काढून झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रश्न सुटावेत, यासाठी फडणवीस यांनी परिषदेला विनंती केली. या समस्येचे लवकर निराकरण करण्यासाठी केंद्रातील सर्व संबंधित मंत्रालयांची महाराष्ट्र सरकारसमवेत बैठक आयोजित करण्याचे निर्देश राजनाथ सिंह यांनी दिले.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत परवडणाछया घरांची निर्मिती करताना, मिठागरे जमिनींचा विकास करण्याविषयीचे धोरण निश्‍चित करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी केंद्राच्या संबंधित अधिकाछयांची भेट घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. पेसा कायद्यांतर्गत तरतुदींची अंमलबजावणी, राष्ट्रीय महामार्गांवरील सरकारी रुग्णालयांमध्ये ट्रॉमा केअर सुविधा विकसित करण्यासाठी क्षमता बांधणी, संपूर्ण लसीकरण यासह इतर विविध विषयांवर परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या एकूण 11 पैकी 9 मुद्यांवर समर्पक तोडगा काढण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)