कॅप स्टाईल्स

उन्हाळा सुरु झाला की कोणी गोलाकार आकाराची टोपी घालतं तर कोणी डोळ्यावर सावली देणारी टोपी पसंत करतं. आजकाल महिला वर्गात प्रचलित सगळं तोंड झाकून घेणारा स्कार्फ जसा प्रिय आहे तसाच बायकिंग फेस मास्क हा टोपी-कम-स्कार्फ ही लोकप्रिय होतो आहे. तसेच इस्त्री करून कपाटात ठेवलेल्या ठेवणीतल्या टिपिकल कॉटनच्या साड्या बायकांच्या अंगावर दिसू लागतात. दंडावर असलेली ब्लाऊजची बाही एकदम नाहीशी होते आणि त्या जागी स्लिवलेस ब्लाऊज येतात. पुरूषांची सुद्धा रात्रीच्या कट्ट्यावर जाताना हाफ पॅन्ट, बर्मुडा, बनीयन टाईप टी-शर्ट. कॉलेज तरूणींना तर काय स्कर्ट, ब्लाऊज, स्लिवलेस टॉप्स्‌, जीन्स एक ना दोन अनेक प्रकार खुणावू लागतात.

कापड बाजारात खास उन्हाळ्यासाठी म्हणून कपडे येतात. त्यात अगदी छोट्या बाळांसाठी झाबली, दुपटी, टोपडी पासून मोठ्यांसाठीचे हलक्‍या वजनाचे, पातळ, मुलायमपर्यंतचे सर्व प्रकार दिसू लागतात. वारंवार तहान लागत असल्याने थंडगार पाण्याची बाटली पुढे येताच मन सुखावून जातं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उन्हात शक्‍यतो जायचं नाही अस ठरवणारे मग कामानिमित्त बाहेर पडतातच. तेव्हा सुद्धा डोक्‍याला टोपी किंवा स्कार्फ, डोळ्याला गॉगल, सनकोट, हॅन्डग्लोज, पायात सॉक्‍स्‌, शक्‍यतो शूज असा जामानिमा करूनचं. या टोपी घालणे या वाक्‍याला जरी वेगळा अर्थ असला तरी उन्हाळ्यात केवळ उन्हापासून बचाव एवढाच अर्थ असतो. कोणी गोल आकाराची टोपी घालतं तर कोणी पोलिसांसारखी डोळ्यावर सावली देणारी टोपी पसंत करतं. आजकाल महिला वर्गात प्रचलित सगळं तोंड झाकून घेणारा स्कार्फ जसा प्रिय आहे तसाच बायकिंग फेस मास्क हा टोपी-कम-स्कार्फ ही प्रिय होतो आहे. या बायकिंग फेस मास्कमधे टोपीच्या आकारातील स्कार्फला कान झाकले जातील अशा प्रकारची रचना असते.

डोक्‍याच्या वरच्या भागात उंचवटा असल्याने टॉप हॅट या प्रकारची टोपी शक्‍यतो एखाद्या पार्टीला वगरे घालतात. फॅशन म्हणून पांढऱ्या रंगात मिळणारे अगदी थ्रीफोर्थ बाह्यांचे ग्लोजही बाजारात मिळतात.पायमोजे शक्‍यतो कॉटनचे आणि अंगठ्याचे व त्यावर शूज किंवा हलक्‍या फुलक्‍या चपला घालणे की स्वारी तयार उन्हात हिंडायला. हे सर्व मोठ्यांसाठी असलं तरी लहानांनी नाराज व्हायची गरज नाही. खास लहानांसाठीचे गॉगल्स, सॉक्‍स, हॅन्डग्लोज, सनकोट हे बाजारात मिळतातच. केवळ पावसाळ्यातच घराबाहेर पडणारी आणि पावसाळा येताच आठवण येणारी छत्री. उन्हापासून वाचवण्यासही मदत करते.

डोक्‍यावर टोपी, डोळ्यावर गॉगल, सनकोट, हॅन्डग्लोज, सॉक्‍स शूज अशा पेहरावात एखादी व्यक्ती दिसली तर हमखास समजावं तिला आपल्या रंगाची किती काळजी आहे. कॉटन उन्हाळ्यात खास वापरला जाणारा कपड्याचा प्रकार. सुती रेशमापासून बनवला जाणारा हा कापड प्रकार. उष्णता कमी प्रमाणात शोषून घेणारा, घाम सुद्धा शोषला जाणारा कापड प्रकार. त्यातल्या त्यात पांढऱ्या रंगात जर कॉटनचा कपडा असेल तर डोळ्यांनाही सुखावतो.

– श्रुती कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)