टोरांटो : कॅनडातील टोरांटोमध्ये डाऊनटाऊनमध्ये एका कारचालकाने पादचाऱ्यांना चीराद्ल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत तब्बल ९ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १६ नागरिक गंभीर जखमी असल्याचे टोरांटोच्या पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेत एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
सोमवारी दुपारी डाऊनटाऊन परिसरातील कर्मचाऱ्यांच्या दुपारच्या जेवणावेळी ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, परिसरातील योंग आणि फिंच या दीड किलोमीटरच्या रस्त्यावर कार चालकाने हे कृत्य केले. प्रत्यक्षदर्शीने या घटनेविषयी, कार चालकाने हा प्रकार रागात आणि मुद्दाम केले असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणातील कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0