कृषी महोत्सवामुळे शेतकरी योजनांना बळकटी

पालकमंत्री राम शिंदे ः नगरमध्ये पुढील चार दिवस कृषी महोत्सवाची लगबग

नगर – “कृषी महोत्सवातून शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद साधला जातो. ही संकल्पना शेतकरी ते ग्राहक योजनेला बळकटी देणारी आहे. शेती आणि शेतकरी जगला तरच राज्य, देश जगेल, अशी भूमिका सरकारची आहे. सरकारचे आतापर्यंत सर्व निर्णय शेतीपूरकच आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा,’ असे मत पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केले.

नगर येथे सावेडी जॉगिंग पार्क मैदानावर आजपासून जिल्हा कृषी महोत्सवाला प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी होते. पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, महापौर बाबासाहेब वाकळे, कृषी उपसंचालक विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आर. के. गायकवाड, आत्माचे उपसंचालक सुरेश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिंदे म्हणाले, “”नगर जिल्ह्यातील शेती विकासात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. तिथे वेगवेगळे संशोधन होत आहे. ते जिल्ह्यासह राज्य आणि देशातील शेतीसाठी फायदेशीर होत आहेत. सरकार ने नवीन तंत्रज्ञान आणले आहे. प्रत्येक मंडळात पर्जन्यमापक बसवले आहेत.” पशुधन वाचवण्यासाठी मुरघास करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी देणार आहे, असेही त्यांनी सांगितले. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर बोराळे यांनी आभार मानले.

दुष्काळ बोअरवेलमधून बेसुमार पाणी उपशामुळे : औटी

सरसकट बोअरवेल घेतले जात आहेत. उपसा झालेल्या पाण्याचे मोजमाप कधी झाले का? बोअरवेलमधून होणाऱ्या बेसुमार पाणी उपशामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने बोअरवेल बंदीचा घेतलेला निर्णय चांगला आहे, असे मत विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांनी व्यक्तकेले. राज्यातील सगळे बोअर बंद करावेत. शेतकऱ्यांनी याचा विचार करावा. बोअरवेल मुक्त गावाचा गौरव व्हावा, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)