कृषी प्रदर्शनास लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी दिली भेट

कापूरहोळ- शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कापूरहोळ येथे आयोजित 5 दिवसीय कृषी प्रदर्शनास एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली. यावेळी कृषी प्रदर्शन शेतकरीभिमुख असल्याचे गौरवोद्‌गार शिवसेनेचे बारामती लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कुलदीप कोंडे यांच्या भोर-वेल्हे-मुळशी शैक्षणिक, सामाजिक कला क्रीडा विकास प्रतिष्ठानच्या वतीने बळीराजा कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी रमेश कोंडे, भानुदास पानसरे, राम गायकवाड, माऊली शिंदे, संतोष मोहोळ, अमोल पांगारे, शैलेश वालगुडे, आदित्य बोरगे, हमीद मुलाणी समवेत परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
मागील 5 वर्षांपासून कुलदीप कोंडे यांच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमात उत्कृष्ट पशु धन मालक व शेती उपक्रम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रदर्शनात चॅम्पियन 2019 ठरलेले सोनकी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी विठ्ठल बिचकुले यांचा खिलार बैलासह सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)