कृषी तंत्र निकेतनच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू – शरद पवार

कृषीतंत्र निकेतन व संलग्न महासंघाच्या शिष्टमंडळाशी चर्चा
नगर – केंद्राच्या धोरणानुसार शेती शिक्षण पायाभूत आहे. ते ग्रामीण शेतकऱ्यांच्या मुलांना मिळाले पाहिजे. यासाठी कृषी तंत्र निकेतनला येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्र कृषीतंत्र निकेतन व संलग्न महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिली.
महाराष्ट्र कृषीतंत्र निकेतन व संलग्न महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. बारामती येथे झालेल्या डॉ.आप्पासाहेब पवार शेती व शिक्षण पुरस्कार कार्यक्रमानंतर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी पवार शिष्टमंडळाशी बोलत होते.
ते म्हणाले, कृषी शिक्षण काळाची गरज आहे. ते अधिक व्यापक झाले पाहिजे. त्यासाठी या शिक्षणाची व्यवस्था माध्यमिक स्तरापासून झाली पाहिजे. असे मत त्यांनी शिष्टमंडळाजवळ व्यक्त केले.
महासंघाचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष उद्धव नेवसे, अनिल मेहेर (नारायणगाव), अरविंद पोटे (ठाणे), राजेंद्र पवार (बारामती), सागर माने (फलटण), गोविंद साळुंके, डॉ.रणजित म्हस्के (बीड), अशोक पाटील, शैलजा पाटील, सुनिल थोरात, आनंदराव पाटील, रमेश देशमुख (नाशिक), चिन्हाप्पा होत्रीकर, ज्ञानदेव वाफारे, विराज मोहिते, आण्णासाहेब परंडकर, डाळींब उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रभाकर चांदणे (सोलापूर), ए.बी.रासकर, शाम भोसले, आदी पदाधिकाऱ्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
यावेळी पवार व महासंघाचे पदाधिकारी यांची विविध विषयांवर चर्चा झाली. महासंघाचे विविध प्रश्‍न व त्यावरील अडचणी मांडण्यात आल्या. पवार म्हणाले,


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)