कृषिदूतांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

अवसरी- कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषिदूत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत अवसरी बुद्रुक येथे दाखल झाले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना जिवाणु खते व बीज प्रक्रिया याविषयी माहिती दिली. यावेळी केंद्रप्रमुख डॉ. बी. डी. तांबोळी, कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. डी. सावळे यांचे सहकार्य लाभले. यावेळी कृषिदूत आकाश जगताप, ऋषीकेश सरडे, विकास किर्वे, स्वप्निल मंडलिक, ऋषीकेश नलावडे, ज्ञानेश्‍वर इंदोरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×