कुसेगावात शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन

कुरकुंभ- कुसेगाव (ता.दौंड) येथे बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या पाटस शाखे च्यावतीने किसान क्रेडिट कार्ड, पीक कर्ज आणि कृषी क्षेत्रातील इतर योजना शेतकऱ्यां पर्यंत पोहचविण्यासाठी शनिवारी (दि.28) शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी कुसेगाव येथील विठ्ठल मंदिरातील सभागृहात शेतकऱ्यांना शेतकरी पशुपालन कर्ज योजना, आधुनिक तंत्रज्ञान शेती कर्ज योजना, तात्काळ कर्ज योजना याबद्दल शेकऱ्यांना माहिती देण्यात आली. शासनाने केलेली कर्जमाफी झाली खरी पण नवीन कर्ज वाटप चालू असून देखील केवळ शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्याने ते या पीक कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्‍यकता आहे. त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे बॅंक ऑफ महाराष्ट्र वरीष्ठ अधिकारी सचिन लोहकरे यांनी सांगितले. यावेळी गावातील 60 ते 70 शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवून या योजनेचा लाभ घेतला. वृद्ध लोकांना बॅंकेत पैसे घेण्यासाठी आणि भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने बॅंकेत वृद्धांसाठी स्वतंत्र खिडकी असावी, असे मत वृद्धांनी मांडले. बॅंकेत येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी समजून घेऊन त्यावर शेतकऱ्यांशी चर्चा केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र पाटस शाखेचे शाखा अधिकारी जी.आर.फडके, झोनल ऑफिससर पुणे येथून आलेले सचिन लोहकरे, सरपंच प्रियंका विनोद शितोळे, माजी सरपंच मनोज फडतरे, विजयसिंह शितोळे, दादासाहेब शितोळे, रमेश भोसले, किरण गायकवाड, विनोद शितोळे यांच्या हस्ते जि. प.प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.

  • जे शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. त्यांना बॅंकेतून वाटप दिली जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी देखील याचा लाभ घ्यावा.
    -जी.आर. फडके, शाखा अधिकारी, बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा,पाटस.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)