कुल-थोरात गटाकडून बहुमताचा दावा

केडगाव- नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कुल-थोरात गटाकडून बहुमताचा दावा करण्यात आला आहे. कार्यकर्ते निवडणुकीत आपल्याच गटाला बहुमत मिळाल्याचे सांगत आहेत.
चालू टप्प्यात दौंड तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये रोटी, वासुंदे, देऊळगाव राजे, देलवडी आणि नाथाची वाडी या ग्रामपंचायतींचा समावेश होता. त्यापैकी देलवडी या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली आणि गोळा झालेला निवडणूक निधी गावाच्या विकासासाठी वापरण्यात येईल, असे ठरवले. उर्वरीत चार ग्रामपंचायत निवडणुका चुरस आणि अटीतटीच्या वातावरणात पार पडल्या. यामध्ये पक्ष महत्त्वाचा नसून तालुक्‍यातील कुल-थोरात गटच आमनेसामने होते.
विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार तथा पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या स्थानिक गटातील कार्यकर्ते निवडणुकीत दिसले. त्या मानाने कॉंग्रेस, शिवसेना यांचा यामध्ये मागमूसही नव्हता. मागील काही दिवसांपासून कुल-थोरात स्थानिक कार्यक्रम असताना एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. थोरात यांनी राहुल कुल यांना लबाड लांडगा अशी उपमा दिली होती, तर कुल यांनी माझ्यामुळे थोरात जिल्हा बॅंकेत आहेत, असा पलटवार केला. या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्‍यातील पाचही ग्रामपंचायत निवडणुका चुरशीने होतील, अशी अटकळ बांधली जात होती. पार पडलेल्या निवडणुका त्याच धर्तीवर झाल्या. निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत आपल्याच गटाला बहुमत मिळाल्याचा दावा केला आहे. सोशल मीडिया आणि चौकात कार्यकर्ते निवडून आलेल्या उमेदवाराचे आणि मतांचे गणित जुळवून आपल्याच गटाला बहुमत कसे, याची खातरजमा करतानाही दिसत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)